।। आयुष्यवंत होवोत..।।

🌹 शुभचिंतन !..अभिष्टचिंतन !!..🌹
शहादा शहर परिसराचे युवानेते मा.अभिजीतदादा पाटील यांच्या वाढदिवस-अभिष्टचिंतन सोहळा निमित्त….

मा.दादा यांचा अभिष्टचिंतन सोहळा नव्हे तर तो आनंदोत्सव सोहळा दिवस असतो.या आनंदोत्सवात नंदुरबार जिल्ह्यातील सामाजिक ,शैक्षणीक,सांस्कृतिक,राजकीय,
साहित्यीक ,क्रिड़ा आदी क्षेत्रातील मान्यवर पदाधिकारी ,कार्यकर्ते उत्स्फुर्तपणे हजेरी लावतात,सामिल होतात व आंनदोत्सव साजरा करतात.
विशेषत:विद्यार्थांची उपस्थिती व सामिलकी म्हणजे आनंद पर्वणीचं असते. यात विविध प्रेरणादायी उपक्रमांची रेलचेल असते ,मग हा अभिष्टचिंतन सोहळा सर्वांचा साक्षीने मोठ्या दिमाखात ,जल्लोषात व उत्साही वातावरणात साजरा केला जातो..
कारण हा अभिष्टचिंतन सोहळा सामान्यजणांचा हृदयस्थानी पोहचलेल्या लोकनेत्याचा असतो..

मा.दादासाहेब यांचे समाजकारण,शिक्षणकारण नंतर राजकारण….
या जीवन समरसतेची सुरुवात एका दशकापुर्वी झाली आणि पाहता पाहता आपल्या कार्यप्रणालीतून सामान्यजणांचा विश्वास संपादन केला आहे…

मा.दादासाहेब हे सहकार चळवळीतील भगीरथ दादाश्री स्व.मोठाभाई फकीरा जयराम पाटील, शिक्षण व कृषि क्षेत्रातील तज्ञ मार्गदर्शक पिताश्री तात्यासाहेब मोतीलाल फकीरा पाटील यांचे कृतिशिल जीवनाचे वारसदार आहेत.समाजाचे व राजकारणाचे बाळकडू आपल्या कुटुंबातील वडीलधार्यांकडून मिळाले आहे.. समाजकारणातून राजकारण..ही यशाची वाटचाल आहे तोच महामंत्र दादांनी आत्मसात केला आहे. सामाजिक मुल्यांची जोपासना ,सामाजिक बांधिलकी आणि सामिलकी , राजकारणात निष्ठा,सभ्यता व कार्यकर्त्यांचे संघटन ही या वाटचालीतील बलस्थाने आहेत. याची जाणीव दादांना असल्याने “कार्यकर्ता” हा समाज व राजकारणाचा “केंद्रबिंदू” त्याचे स्थान मोलाचे असते. ही तत्वे अंगीकारत दादांची वाटचाल सुरु आहे,म्हणूनचं संपुर्ण जिल्हाभर दादांवर विश्वास व निष्ठा असलेली असंख्य कार्यकर्त्यांची फळी निर्माण झाली आहे.हे सर्वश्रुत आहे ते सर्वमान्य झाले आहे.

जीवाची पर्वा न करता कोरोनाचा काळात दादांचे योगदान,त्यांची भुमिका अनमोल ठरली आहे. अनेकांना जीवनदान दिले आहे.हा प्रसंग लोकांनी उघड्या डोळांनी पाहीला आहे अनुभवला आहे..
दादासाहेब हे उच्च विद्याविभुषित असून विदेशातील गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून आपल्या जन्म भूमिलाच कर्मभूमी मानत सामान्य जणांची सेवा,शेतकर्यांचे जीवनमानात परिवर्तन झाले पाहीजे ,त्यांचा सर्वांगीण विकास व सुजलाम् सुफलाम झाले पाहीजे, जीवनमान उंचावले पाहीजे या स्वप्नपुर्तीसाठी सातत्याने प्रयत्नशिल असतात..
वनश्री तात्यासाहेबांचा सामाजिक व राजकीय जीवन प्रवास संघर्षाचा राहीला आहे. हा संघर्षाचा प्रवास जवळून पाहीला आहे,अभ्यासला
आहे.तात्यासाहेबांच्या जीवन प्रवासातील कटू अनुभवातून मिळालेले धडे दादांना दिशादर्शक ठरले आहेत आणि याच अनुभवातून दादांचा आत्मविश्वास दृढ होत गेला आहे.

समाजसेवेचे व्रत कुटूंबीयाकडूनचं मिळाल्याने दादांनी गंगोत्री फाउंडेशन या सेवाभावी संस्थेची निर्मिती करुन त्या माध्यमातून अनेक समाजाभिमुख उपक्रम यशस्वीपणे,व्रतस्थ व नि:स्वार्थी भावनेने राबवित असतात ..

“समाजाचे आपण देणं लागतो” या ऋतज्ञतेच्या भावनेतून मा.अभिजीत दादा यांचा पुढाकाराने बोराळे (नंदुरबार)येथील भारतमातेचे सुपुत्र शहीद मिलींद खैरनार यांचे स्मृति प्रीत्यर्थ उभारण्यात आलेले हुतात्मा स्मारक.. तसेच शहादा येथे शिव छत्रपती शिवाजी महाराज यांचा नांवे समितीची स्थापना करुन शहादा नगरीत ऐतिहासीक काम झाले आहे ते शहराचा वैभवात भर घालणारे ठरले आहे. ते आहे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक ,महाराष्ट्राचे दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य आणि दिव्य अश्वारुढ पुतळाची प्रतिष्ठापना…
हा सोहळा जल्लोषात झाला, हा नेत्रदीपक सोहळा शहरवासियांच स्मरणात चिर:काल राहील..

दादासाहेब शेतकरी आहेत त्यांना शेतकर्यांचे कष्ट व दु:ख याची जाणीव असल्याने अनेकदा शेतकरी मेळाव्यांचे आयोजन केले व मेळाव्यांना हजोरोंचा संख्येने शेतकरी बांधव उपस्थित राहीले सुध्दा आहेत. केळी ,पपई पिकांना योग्य भाव मिळाला पाहीजे या न्याय हक्कांसाठी शेतकरी बांधवांना संघटीत करुन आंदोलने केली आहेत ,शासन दरबारी निवेदने देवून संघटनेची ताकद काय असते हे सुध्दा दाखवून दिले आहे. मा.दादा ताकदवार लोकनेते आहेत हे अनेकदा सिध्द झाले आहेत.

श.ता.एज्यू .सोसा.या नामांकीत शैक्षणीक संस्थेचे अध्यक्ष वनश्री मा.तात्यासाहेब मोतीलाल फकीरा पाटील यांचा कुशल मार्गदर्शनाखाली मा.अभिजीतदादा यांचा अथक परिश्रमातून शिक्षण संस्थेत विद्यार्थांच्या बौध्दीक विकास व्हावा ,त्यांच्या बौध्दीक क्षमतेला सामर्थ प्राप्त व्हावे , त्यांचा सर्वागीण व्हावा त्यासाठी संस्थेच्या संचालकांसह दादांचे मार्गदर्शन व योगदान मोलाचे असते .या संस्थेत विद्या शाखेची विविध दालने निर्माण होत असून “शैक्षणीक वटवृक्षाचे रुप धारण करीत आहे. ही शिक्षण संस्था शैक्षणीक क्षेत्रात मानबिंदू ठरली आहे. या संस्थेत मा.अभिजीतदादा विद्यमान संचालक असून त्यांचे मार्गदर्शन मौलिक असते..

मा. अभिजीतदादा पाटील यांचा यशस्वी वाटचालीत दादांच्या सुविद्य पत्नी मा. सौ.प्रितीताई अभिजीत पाटील यांची साथ अनमोल ठरणारी आहे….

नंदुरबार जिल्ह्यातील नामांकित शहादा कृषि उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती आहेत. या संस्थेचा कामकाजात आमुलाग्र बदल केला असून शेतकर्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून लवकरचं अद्यावत व सर्व सोयी सुविधांनी युक्त अशी भव्य वास्तू लवकरचं निर्माण होईल असा विश्वास दादांनी व्यक्त केला आहे..

मा.अभिजीतदादा पाटील यांच्या कार्यप्रणालीतून सामाजिक ,शैक्षणीक विकासासोबत शेतकर्यांचे कल्याण ,सामान्यजणांचा जीवनात परिवर्तन होवून “बहुजन हिताय बहुजन सुखाय होवो. व नंदुरबार जिल्ह्याचा विकासात दादा मानबिंदू ठरोत..!
या शुभचिंतनासह !..हार्दीक शुभेच्छा !!..

“सुंदर विचाराची माणसं अंधारात चमकणार्या “काजव्या”सारखी असतात. आपल्या विचारांच्या तेजाने गर्दीतही उठून दिसतात..
असेचं तेजस्वी व कणखर नेतृत्व मा.अभिजीतदादा पाटील यांच्या रूपाने नंदुरबार जिल्ह्यात उदयास आले आहे..
💐🌸🌺🦚🌺🌸💐
लोटनराव धोबी
पत्रकार ,माजी नगरसेवक शहादा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *